Indian Constitution, भारतीय साविधानाबद्दल काही विशेष माहिती.

Indian Constitution in Marathi PDF, भारतीय साविधानाबद्दल काही विशेष माहिती.

{ Indian Constitution } ,भारतीय साविधना बद्दल काही विशेष माहिती खाली वर्णविले आहे.

? 26 नोव्हेंबर 1949 | संविधान दिवस

भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडली

? डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा भारतीय संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले

? भारतीय संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधानाचा स्वीकार केला.

? भारतीय संविधानाबद्दल 10 महत्वाच्या गोष्टी….

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला राज्यघटना प्रदान केली.म्हणून जाणून घेऊयात संविधानाबद्दल १० महत्त्वाच्या गोष्टी…

१. २६ नोव्हेंबरला संविधान दिवस का साजरा केला जातो?

२६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. कारण २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संसदेत संविधानाला मान्यता देण्यात आली होती.

२. संविधानाच्या निर्मितीसाठी किती वेळ लागला?

  • संविधान सभेनं 2 वर्षे ११ महिने 18 दिवस या दीर्घ कालावधीत संविधान पूर्ण केलं.

३. कसं लिहीलं गेलं संविधान?

-आपलं संविधान हिंदी आणि इंग्रजी भाषेत हातानं लिहिलं गेलं. यानंतर बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं ते पुन्हा कॅलिग्राफत लिहिण्याी जबाबदारी त्यांना

देण्यात आली. भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.

४. संविधान सभेचे प्रमुख कोण कोण होते?

-२९ऑगस्ट १९४७ पासून मसुदा समितीनं आपल्या कामकाजास सुरुवात केली. जवाहरलाल नेहरू,अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन. गोपालस्वामी अय्यंगार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, के. एम.

मुन्शी, सय्यद मोहमद सादुल्लाह, बी. एल. मित्तर, डी. पी. खैतान अशा दिग्गज नेत्यांच्या मसुदा समितीने भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला आहे.

५. संविधान सभचे अध्यक्ष कोण होते?

-९ डिसेंबर १९४६ रोजी घटना समिती गठीत करण्यात आली. सच्चिदानंद सिन्हा या समितीचे हंगामी अध्यक्ष होते. पुढं ११ डिसेंबर १९४६ रोजी डॉ. राजेंद्रप्रसाद या समितीचे अध्यक्ष झाले.

६. संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?

-फाळणीनंतर संविधान सिमितीच्या संदस्यांची संख्या २९२ झाली. समितीच्या ११ बैठका झाल्या. त्या १६५ दिवस चालल्या. समितीच्या १९ उपसमित्या जलद कामकाजाच्या दृष्टीनं कार्यरत

होत्या. त्यात मसुदा समिती होती. या महत्त्वाच्या समितीच्या अध्यक्षपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. या मसुदा समितीच्या ४४ सभा झाल्या.

७. आपल्या संविधानात किती परिशिष्टे आहेत?

  • भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. समता, बंधुता, स्वातंत्र्य व न्याय तसेच प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री या मूल्यांची राज्यघटनेत बीजे रोवून भारताच्या

संविधानाची निर्मिती करण्यात आली. मुळ घटनेत १ प्रास्ताविका, ८ अनुसुची, २५ भाग आणि ३९५ कलमे होती. सध्या (जुलै २०१७) मध्ये भारताच्या घटनेत १ प्रास्ताविका, १२ अनुसुची, २५

भाग, ४४८ कलमे, ५ परिशिष्टे आहेत. आतापर्यंत १०१ घटनादुरुस्त्या झाल्या आहेत.

८. भारतीय संविधान कधी लागू करण्यात आलं?

-२६ जानेवारी, १९५० रोजीच भारतीय संविधानाचा स्वीकार करण्यात आला. भारत देश प्रजासत्ताक देश म्हणून अस्तित्वात आला.

९. संविधानात कोणाचं हस्तलेखन आहे?

  • भारताचे संविधान बनून तयार होत होते. पण संविधान हे हस्तलिखीत असावं अशी नेहरुंची इच्छा होती. बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं याची जबाबदारी

त्यांना देण्यात आली. संविधान लिहिण्यासाठी २५४ दौत आणि ३०३ पेन वापरण्यात आले. संविधान लिहिण्यासाठी ६ महिने लागले.

१०.संविधानाच्या पानांवर नक्षीकाम कोणी केलं?

-आचार्य नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतनमधील कलाकारांनी भारतीय संविधानातील संपूर्ण हस्तकला पूर्ण केली होती. तसंच प्रास्ताविकाच्या व संविधानाच्या इतर

पानांवरील नक्षीकाम व सजावट जबलपूरचे व्यौहार राममनोहर सिन्हा यांनी बनवलेली आहे.

गेल्या दशकातील सर्व घटनादुरुस्तींचा थोडक्यात आढावा –

95 वी घटनादुरुस्ती (2010) – अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती तसेच अँग्लो इंडियन समाज यांच्या संसद व राज्य विधिमंडळ येथील आरक्षणास आणखी 10 वर्षे मुदतवाढ.

96 वी घटनादुरुस्ती (2011) – ओरिसा राज्याचे नाव ओडिशा तसेच ओरिया भाषेचे नाव ओडिया केले गेले.

97 वी घटनादुरुस्ती (2012) – सहकारी संस्था स्थापन करणे आता मूलभूत अधिकार तसेच सहकारी संस्थांबाबत नवीन भाग IX-B चा समावेश.

98 वी घटनादुरुस्ती (2013) – कर्नाटक राज्यातील हैद्राबाद-कर्नाटक भागासाठी अनुच्छेद 371-J अन्वये विशेष तरतुदी.

99 वी घटनादुरुस्ती (2015) – राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाची स्थापना. परंतु सर्वोच्च न्यायालयाने ही घटनादुरुस्ती घटनाबाह्य ठरवली.

100 वी घटनादुरुस्ती (2015) – भारत व बांगलादेश यांच्यातील सीमावादाचा निपटारा करणे.

101 वी घटनादुरुस्ती (2016) – केंद्र तसेच राज्ये यांच्या एकापेक्षा अधिक अप्रत्यक्ष करांऐवजी संपूर्ण देशात एकच वस्तू व सेवा कर.

102 वी घटनादुरुस्ती (2017) – राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग आयोगास घटनात्मक दर्जा.

103 वी घटनादुरुस्ती (2018) – आर्थिक मागासवर्गास शिक्षण तसेच नोकरी यांत 10 टक्के आरक्षण.

104 वी घटनादुरुस्ती (2019) – अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्या संसद व राज्य विधिमंडळ येथील आरक्षणास आणखी 10 वर्षे मुदतवाढ परंतु अँग्लो इंडियन आरक्षणास मुदतवाढ नाही.

✅ भारतीय घटनेत इतर देशांकडून घेतलेल्या गोष्टी

? ससदीय शासन पद्धती : इंग्लंड

? मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड

? राष्ट्रपती निवडणूक पद्धत : आयर्लंड

? राज्यसभेवरील नामनिर्देशित सदस्य : आयर्लंड

? मलभूत हक्क : अमेरिका

? नयायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका

? नयायालय पुनर्विलोकन : अमेरिका

? उपराष्ट्रपतीपद : अमेरिका

? कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड

? सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड

? कायदा निर्मिती : इंग्लंड

? लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड

? घटनादुरूस्ती : दक्षिण आफ्रिका

? आणीबाणी : जर्मनी

? ससदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया

? सघराज्य पद्धत : कॅनडा

? शष अधिकार : कॅनडा .

२६ नोव्हेंबर : संविधान दिन

? घटना समितीत १५ महिला सदस्यांचा समावेश होता

?‍♀ १) अम्मू स्वामीनाथन
?‍♀ २) एनी मस्करीन
?‍♀ ३) बेगम एजाज रसूल
?‍♀ ४) दक्षयानी वेलायुधन
?‍♀ ५) दुर्गाबाई देशमुख
?‍♀ ६) हंसा मेहता
?‍♀ ७) पुर्णिमा बँनर्जी
?‍♀ ८) रेणुका रे
?‍♀ ९) सरोजिनी नायडू
?‍♀ १०) विजयालक्ष्मी पंडित
?‍♀ ११) सुचिता कृपलानी
?‍♀ १२) कमला चौधरी
?‍♀ १३) लीला रे
?‍♀ १४) मालती चौधरी
?‍♀ १५) राजकुमारी कौर

Indian Constitution

भारतीय साविधना बद्दल संपूर्ण माहिती हवी असल्यास खाली दिलेल्या PDF file वाचावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *